Wednesday, December 22, 2010

पिंपळपान





काजव्यांनी बहरलेला 

पिंपळ आठवतो 
जाळीच्या पानासाहित 
आठवणी वहीत साठवतो .....


तिथेच दडली आहे 
भुताच्या गोष्टीतली चेटकीण 
एक रात्र काढून दाखव 
असली केली होती बेटिंग 


आठवते ते पोपटाचे घरटे 
कावळ्यांची कावकाव 
सुतार पक्ष्याची ठक ठक 
चिमण्यांची कलकल 


तळ्यात पडलेले पान कधी 
मुंगीचे प्राण वाचवते 
कबुतराला परतफेड करत 
परोपकाराचा धडा शिकवते 


आठवणीना माझ्या 
असा येतो उमाळा
तळ्यात पडलेले पान जसे
पाण्याला देते शहारा


..............◄♪♫ संदिप पाटील ♫♪►

Tuesday, December 21, 2010

निर्माल्य





सजले वेलीवरती 

एक फुल कोवळेसे
जन्मताच होते 
तव शाप निर्माल्याचे 


म्हणती त्या कुणीही 
तुज भाग्य हे लाभले 
हि रीत जोगव्याची
का कुणास पटते 

गर्दीत त्या फुलांच्या 

कोमेजून ते गेले 
प्रक्तानास तयाच्या
जगणे मंजूर नव्हते
                                  
                               .....◄♪♫ संदिप पाटील ♫♪►
Related Posts Plugin for WordPress, Blogger...