Tuesday, August 24, 2010

राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा

Wednesday, August 18, 2010

आता उठवू सारे रान

आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान 
शेतकऱ्यांच्या राज्यासाठी लावू पणाला प्राण


किसान मजूर उठतील, कंबर लढण्या कसतील 
एकजुटीची मशाल घेउनी पेटवतिल सारे रान

कोण आम्हा अडवील, कोण आम्हा रडवील 
अडवणूक त्या करणारांची उडवू दाणादाण


शेतकऱ्यांची फौज निघे, हातात त्यांच्या बेडि पडे
तिरंगि झेंडे घेती, गाती स्वातंत्र्याचे गान


पडून ना राहू आता, खाऊ ना आता लाथा
शेतकरी अन्‌ कामकरी मांडणार हो ठाण



गीत - साने गुरुजी

Sunday, August 15, 2010

अर्धीच रात्र वेडी

 
अर्धीच रात्र वेडी अर्धी पुरी शहाणी
भोळ्या सदाफुलीची ही रोजची कहाणी 

फुलले पुन्हा पुन्हा हा केला गुन्हा जगाचा 
ना जाहले कुणाची पत्त्यामधील राणी

येता भरून आले जाता सरून गेले 
नाही हिशेब केले येतील शाप कानी

आता न सांध्य तारा करणार रे पहारा
फुलणार नाही आता श्वासात मूढ गाणी

शापू तरी कशाला या बेगडी जगाला 
मी कागदी फुलांनी भरतेच फुलदाणी 
 
 
गीत - विं. दा. करंदीकर

मागु नको सख्या

 
मागु नको सख्या, जे माझे न राहिलेले 
ते एक स्वप्न होते स्वप्नात पाहिलेले !

स्वप्नातल्या करांनी, स्वप्नातल्या तुला मी
होते न सांग का रे सर्वस्व वाहिलेले ?

स्वप्नात वाहिलेले म्हणुनी कसे असत्य
स्वप्नास सत्य असते सामील जाहलेले

स्वप्नातल्या परीला स्वप्नात फक्त पंख
दिवसास पाय पंगु अन्‌ हात शापिलेले

स्वप्नात परीला स्वप्नात ठेवुनी जा
हे नेत्र घेऊनि जा स्वप्नात नाहलेले

जा नेत्र घेऊनि जा स्वप्नांध पांगळीचे
आता पहावयाचे काही न राहिलेले
 
 
गीत - विंदा करंदीकर

Friday, August 13, 2010

तुझ्या एका हाकेसाठी

तुझ्या एका हाकेसाठी,
किती बघावी ही वाट.....
माझी अधिरता मोठी
तुझे मौन ही अफाट.....

तुझ्या एका हाकेसाठी,
उभी कधीची दारात,
तुझी चाहूलही नाही,
होते माझीच वरात....

तुझ्या एका हाकेसाठी,
हाक मीच का घालावी ?
सात सुरांची आरास,
मीच मांडून मोडावी.....

आले दिशा ओलांडून,
दिली सोडून रहाटी.....
दंगा दारात हा माझा,
तुझ्या एका हाकेसाठी......

तुझ्या एका हाकेसाठी,
किती बघावी ही वाट.....
माझी अधिरता मोठी
तुझे मौन ही अफाट


- यशवंत देव


Sunday, August 1, 2010

खिडकीतले चिमणीचे घरटे

Related Posts Plugin for WordPress, Blogger...