Sunday, October 3, 2010

मी तुझी कुणी नव्हते आणि कुणी नाही

मी तुझी कुणी नव्हते आणि कुणी नाही
विसर सर्व घडलेलेविसर तू मलाही

झुरते बन माडांचेआणि शुक्रतारा
भरतीचे स्वप्न बघतविकल का किनारा
रंग रंग विरले रेखिन्न दिशा दाही

सांजवेळसंथ डोहहाक जीवघेणी
शब्दाविण डोळ्यांनीवाचिली कहाणी
तो वेडा स्पर्श कायछळिल रे तुलाही

काचुकल्या वाटा अन् का घडल्या भेटी
का जपले दवहळवेगीत तुझ्यासाठी
सूरसूर बुडले रेअदय या प्रवाही

सूर मनांतिल कधिहीआणु नये ओठी
लावु नये जीव असाकधिच कुणासाठी
निर्माल्यच ये करातगंध उडुन जाई

पुढल्या जन्मीच पुरे हे अधुरे गाणे
पुढल्या जन्मीच पुरे स्वप्न हे दिवाणे
चुरलेली शपथ तिथे विसरणार नाही

- मंगेश पांडगावकर   

No comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...