माझ्या आवडत्या कवितांपैकी एक ...बा. भ. बोरकरांची " सरीवर सरी आल्या ग "
सरीवर सरी आल्या ग सचैल गोपी न्हाल्या ग
गोपी झाल्या भिजून चिंब थरथर कापती निंब कदंब
मनामनातून टाळ मृदंग तनुत वाजती ताल तरंग
पाने पिटती टाळ्या ग
मल्हाराची जळा सरून प्रीत नाचते अधून मधून
गोपी खिळल्या मनी भिजून घुमतो पावा सांग कुठून
कृष्ण कसा उमटेल मधून
वेली ऋतुमती झाल्या ग
अंबर अंबर पारा ग गोपी दुधाच्या धारा ग
दुधात गोकुळ साय बुडून अजून आहे कृष्ण दडून
मी तू पण सारे मिसळून
आपणही जाऊ मिसळून
सरीवर सरी आल्या ग दुधात सांडून झाल्या ग
No comments:
Post a Comment